मंगळसूत्र न घातल्याने काय बिघडणार? क्षिती जोगचे सडेतोड उत्तर!
“मंगळसूत्र न घातल्याने असं काय होणार आहे?”, मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगला सुनावल्यानंतर स्पष्ट उत्तर, म्हणाली, “खूप वायफळ वेळ…”
मराठी अभिनेत्री क्षिती जोग आणि अभिनेता हेमंत ढोमे हे मराठी मनोरंजनातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे एकत्र आहेत आणि त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकतीच क्षिती यांनी 'आरपार' या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली आणि यावेळी तिने लग्नानंतर मंगळसूत्र घालण्याबाबत टीका करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे.
लग्नानंतर काही दिवसांनी मंगळसूत्र न घातल्यामुळे खळबळ:
लग्नानंतर एका समारंभात क्षिती हिने मंगळसूत्र न घातल्याने काही लोकांनी तिला प्रश्न विचारले होते. यावर क्षिती जोग म्हणाली, "मी त्यावेळी म्हटलं होतं की, माझ्या नवऱ्याला आणि मला माहित आहे की आम्ही लग्नबद्ध आहोत. मंगळसूत्र हा एक सुंदर दागिना आहे आणि मला तो घालायला आवडतो. पण ते माझ्या मनावर अवलंबून आहे. जेव्हा माझं मन असेल तेव्हा मी साडी, गजरा, टिकली यांसारखे दागिने घालेल आणि जेव्हा मन नसेल तेव्हा घालणार नाही."
क्षितीने पुढे सांगितले की, "मी हे तुमच्यासाठी किंवा समाजासाठी करत नाही. हे मी माझ्यासाठी करते. मला माहित आहे की मी लग्नबद्ध आहे आणि मला मंगळसूत्र घालायचं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारत नाही की त्याने लग्न केलं आहे का? मग तुम्ही मला का विचारता? असे विचार करणाऱ्या लोकांकडे खूप वायफळ वेळ असतो आणि त्यांच्या आईने वेळीच त्यांना दोन धपाटे घातले असते तर असे विचार करायची वेळ आली नसती."
क्षितिने आरपारच्या वुमन की बातमध्ये दिलेल्या या मुलाखतीला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.क्षितिच्या या मुलाखतीला कॉमेंट करतांना एक युजर म्हणते "सहजच हं... पुरुषांना मंगळसूत्र का नाही ?. असं काहीतरी हवं जे समोरून दिसेल आणि कळेल की ह्या पुरुषाचं लग्न झालंय!
दुसरी युजर म्हणते "अगदी बरोबर. कपडे, दागिने, अन्न आणि धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे. कधी, काय हे ज्याचं त्याने ठरवायला हवं. इतरांचा यात काहीही संबंध नाही." आशा प्रकारच्या कॉमेंट आल्या असून, क्षितीने मंगळसूत्र न घातल्यावर टीका करणाऱ्यांना दिलेलं हे सडेतोड उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे आणि अनेकांनी क्षितीच समर्थन आणि विरोध ही केला आहे.