विक्रांत मेस्सीचा मालिकाविश्वाला रामराम; म्हणाला "स्त्रियांना...
आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित '12th Fail' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जिंकणाऱ्या विक्रांत मेस्सीने मालिकाविश्वाला रामराम केला आहे, कारण एकूण विचारात पडाल.;
आयपीएस अधिकारी मनोज शर्मा manoj sharma यांच्या जीवनावर आधारित '12th Fail' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जिंकणाऱ्या विक्रांत मेस्सीने vikrant messi मालिकाविश्वाला रामराम केला आहे. 'बालिका वधू', 'धरम वीर' आणि 'बाबा ऐसो वर ढूंढो' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केल्यानंतर विक्रांतने हा निर्णय घेतला आहे.
एबीपी लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत म्हणाला, "मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला कारण मला आता त्यातील कंटेंट आवडत नाही. मला ते निकृष्ट दर्जाचे वाटतात. स्त्रियांना त्यांच्या हक्काची भूमिका मिळत नाही, तर त्यांना फक्त निकृष्ट दर्जाच्या भूमिका दिल्या जातात."
विक्रांतने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर ‘छपाक’,‘हसीन दिलरुबा’,‘लूटेरा’,‘गिन्नी वेड्स सनी’ व आता ‘12th fail’ हे चित्रपट केले आहेत. तर विक्रांत 'बालिका वधू' सारख्या मालिकेत काम करण्याचा अभिमान बाळगतो. त्याच्या मते, या मालिकेमुळे महिला सुरक्षा आणि लहान मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली. मात्र, अशा कंटेंटसाठी काम केल्यानंतर अनेक निर्मात्यांशी वाद झाले आणि त्याला मालिकांमधून काढून टाकण्यात आले.
विक्रांतला ओटीटी आणि चित्रपटांमधील कंटेंट अधिक चांगला वाटतो. त्याच्या मते, यात प्रत्येक पात्र बारकाईने दाखवले जाते आणि चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव वेगळा असतो.
विक्रांत लवकरच एकता कपूरच्या 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटात दिसणार आहे.