रवीना टंडनची १८ वर्षांची मुलगी राशा थडानी सध्या चर्चेत आहे. अलीकडेच राशा मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली होती. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि चर्चा याच व्हिडिओची आहे.. नक्की काय घडलं ? राशा थडानी यांची समाजमाध्यमांवर इतकी चर्चा का होतेय?
हे सर्व ऐकून पाहून तुम्हाला शंका किंवा मनात पाल तर नक्कीच चुकचुकली असेल की बाबा रे या रविना टंडनच्या मुलीनं असं नक्की काय केलं. तर तिने असं काहीच केलं नाहीये. आपल्याकडे कसं आहे ना, सेलिब्रिटींची मुलं म्हटलं की त्यांची चर्चा ते नुसते दिसले तरी होते. आता रविना टंडनची मुलगी म्हटल्यावर तिची पण अशीच चर्चा होणार ना... खास असं काहीच झालं नाही, राशा थडानी या एका हॉटेलमध्ये आली होती राशा तिथे पोहोचल्यानंतर तिथं असलेल्या पापाराजींनी त्यांचा व्हिडिओ केला. आता व्हिडिओ केला म्हटल्यावर तो व्हायरल तर होणारच..अगदी तसाच तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली म्हणून समाज माध्यमांवर त्याची चर्चा सुरू झाली बस बाकी काही नाही...