कतरिनाला घटस्फोट देणार का? पत्रकाराचा प्रश्नानंतर विकी कौशल शॉक..

Update: 2023-05-16 05:20 GMT

विकी कौशल आणि सारा अली खान जरा हटके जरा बचके या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान मीडियाशी संवाद साधत होते. यादरम्यान एका रिपोर्टरने विकीला विचारले की, जर त्याला कतरिना कैफपेक्षा चांगली मुलगी मिळाली तर तो तिला घटस्फोट देणार का? आणि मग या प्रश्नानंतर विकीने काय केलं? बरं असा प्रश्न केल्यावर काय जे व्हायचं तेच झालं. काय झाला हा सर्व प्रकार शेवटपर्यंत वाचा...

जरा हटके जरा बचके हा चित्रपट एका जोडप्याची कथा मांडतो ज्यांना एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे. अगदी त्याचंच चित्रपटाच्या अनुषंगाने एका पत्रकाराने जर त्याला कतरिना कैफपेक्षा चांगली मुलगी मिळाली तर तो तिला घटस्फोट देईल का? असा प्रश्न विचारला हे ऐकून विकीला धक्काच बसला. मग स्वतःला सांभाळून या प्रश्नाचे उत्तर देत तो म्हणाला सर, मला संध्याकाळी घरी जायचे आहे. असे काहीपण प्रश्न विचारत आहात, मी लहान आहे, मला आता मोठे होऊ द्या. याचे उत्तर मी कसे देऊ? असा धोकादायक प्रश्न तुम्ही विचारला आहे.

काहीही झाले तरी मी कतरिनाच्या सोबत आयुष्यभर असेन.

यासंबंधीचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. विकी-कतरिनाच्या चाहत्यांना त्यांचा प्रतिसाद खूपच आवडला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले - विकीसाठी कतरिना नंतर कोणी नाही. कतरिना त्याच्या आयुष्यातील प्रेम आहे.

Tags:    

Similar News