भारतातील Top 5 ,ज्यांचे Instagram Followers आहेत सर्वात जास्त
इंस्टाग्राम ,फेसबुक ,ट्विटर या सोशल मीडिया साईट वर जितके फॉलोवर्स जास्त तितकी प्रसिद्धी जास्त असलेले अनेक सेलिब्रिटी आपण पाहिले आहेत . पण तुम्हाला माहिती आहे का ?की भारतातील इंस्टाग्राम वरील पहिले पाच लोकप्रिय व्यक्ती कोण आहेत ? नसेल तर संपूर्ण लेख जरूर वाचा...;
भारतामध्ये क्रिकेटला जितकं प्रेम दिलं जातं तितकं कदाचितच दुसऱ्या खेळाला दिलं जातं . त्यामुळे क्रिकेट जगतातील तरुण नाव म्हणून विराट कोहली प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर इंस्टाग्राम ला सुद्धा तो पहिल्या क्रमांकावर आहे . त्याचे फॉलोवर्स 249.1 मिलियन आहेत.
यानंतर अभिनय क्षेत्रातील अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचं नाव येतं. प्रियांका चोप्राचे इंस्टाग्राम वरील फॉलोवर्स 87. 37 मिलियन इतके आहेत.
यानंतर तरुण वर्गात लोकप्रिय असणारी श्रद्धा कपूर ,ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची इंस्टाग्राम यूजर आहे . तिचे 80.67 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत
चौथ्या क्रमांकावर सुद्धा भारतीय अभिनेत्री आलिया भट आहे . आलिया भटला एकूण 77.73 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. आलिया भट तिच्या अल्लड स्वभावामुळे सुरुवातीला ट्रोल झाली होती . पण आज तीच चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिकेतून जगप्रसिद्ध झाली आहे आणि भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात जास्त इंस्टाग्राम फॉलोवर्स असणारी व्यक्ती आहे.
आणि पाचव्या क्रमांकावर आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी . नरेंद्र मोदींना 75.1 मिलियन इतके इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत.
इंस्टाग्रामचे Top 5 भारतातील युजर्स कोण आहेत त्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे. ही माहिती कशी वाटली हे प्रतिसादात नक्की कळवा.