Happy Birthday Sushmita Sen : आज बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनचा वाढदिवस
आज बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनचा वाढदिवस. 1994 मध्ये सुष्मिता सेनने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्याच वर्षी सुष्मिता मिस युनिव्हर्स म्हणून देखील निवडली गेली. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षांत सुष्मिताने हे यश मिळवले होते. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यासाठी सुष्मिताला खूप मोठा पल्ला गाठायचा होता.
सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या दोघींनी मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा गोव्यात पार पडली होती. मिस इंडिया जिंकण्यासाठी सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय प्रबळ दावेदार होत्या. एवढंच नाही तर खुद्द सुष्मिताचाही असा विश्वास होता की, ऐश्वर्या खूप सुंदर असल्याने तिची सरशी झाली होती.
मात्र, मिस इंडियाच्या शेवटच्या फेरीत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात बरोबरी झाली. मिस इंडियाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार, याची उत्सुकता त्यावेळी सर्वांच्याच मनात होती. परीक्षकांनी दोघींना 9.33 गुण दिले होते. यानंतर दोघींना प्रत्येकी एक प्रश्न विचारला जाणार होता, ज्याचे उत्तर चांगले असेल, ती मिस इंडियाचा किताब जिंकेल, असे ठरले.
परीक्षकांनीनी ऐश्वर्या रायला प्रश्न विचारला की, 'तुझ्या पतीमध्ये कोणता गुण पाहायला आवडेल? रिज फॉरेस्टर किंवा मेसन कॅपवेल सारखा बोल्ड आणि सुंदर.' रिज फॉरेस्टर आणि मेसन कॅपवेल ही दोन्ही हॉलिवूड मालिकेतील पात्रांची नावे आहेत. उत्तरात ऐश्वर्या म्हणाली, 'मेसन. आम्हा दोघांमध्ये अनेक गोष्टी साम्य आहेत. मेसन खूप काळजी घेणारा आहे आणि त्याच्याकडे विनोदाची चांगली शैली आहे. ज्याचा स्वभाव माझ्याशी जुळतो.'
त्यानंतर सुष्मिता सेनला प्रश्न विचारण्यात आला की, 'तुम्हाला तुमच्या देशाच्या कापडाच्या वारशाबद्दल काय माहिती आहे? हे कधी सुरू झाले? आणि तुला काय परिधान करायला आवडेल?' हा असा प्रश्न होता, ज्याचं उत्तर देताना सुष्मिता ऐश्वर्यापेक्षा वरचढ ठरली. ती म्हणाले की, 'मला वाटते महात्मा गांधींच्या काळापासून याची सुरुवात झाली.मला भारतीय आणि पारंपारिक कपडे घालायला आवडतात. मला माझ्या वॉर्डरोबमध्ये भारतीय कपडे हवे आहेत.' आणि या प्रश्नाच्या उत्तराने सुष्मिताने
परिक्षकांना प्रभावित केले आणि त्यांची मनं जिंकली.