"खुप आठवणी आहेत, लक्ष्या मामा..!"

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृती दिनानिमीत्त अभिनेते भरत जाधव यांनी सांगितली पछडलेला चित्रपटाची आठवण

Update: 2020-12-16 08:45 GMT

खुप आठवणी आहेत. आम्हा नवोदितांना त्यांनी ज्या प्रकारे वेलकम केल, आधार दिला... त्यांनी आपल स्टार पण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना मामा म्हणुन हाक मारू शकायचो. खुप काही शिकलो त्यांच्याकडून. त्यांच्या बद्दल सांगायची सगळयात मोठी आठवण म्हणजे पछाडलेला चित्रपट.

'सही रे सही' जोरात सुरू होत. अशातच जानेवारी २००३ ला महेश कोठारे सरांनी पछाडलेला साठी विचारलं. आणि त्यांना लगेच काम सुरू करायचं होत. मला त्या एका वर्षात ऑगस्ट २००३ पर्यंत सही चे जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते त्यामूळे मी त्यांना नकार कळवला.

मध्ये काही महिने गेले आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात लक्ष्या मामांचा फोन आला की," तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे... महेश ला पटकन जाऊन भेट मी तुझ्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय... तो पिक्चर सोडू नकोस."

मग त्याच रात्री उशिरा महेश सरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आणि तिथून लक्ष्या मामांना कळवल की मी पछाडलेला करतोय.

सांगायचा मुद्दा हा की, इतका मोठा माणूस... कोणालाही घेऊ शकले असते. पण त्यांनी ती एवढी मोठी संधी मला दिली. पछाडलेला ला मी त्यांचा आशीर्वाद मानतो.

विनम्र अभिवादन!

Tags:    

Similar News