कंगुवा चित्रपटाचा फर्स्ट लुक आला समोर...

Update: 2023-07-23 13:12 GMT

तामिळ सुपरस्टार सुरियाच्या कांगावा या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. चित्रपट निर्मात्यांनी सुर्याच्या 48 व्या वाढदिवसाच्या प्रसंगी चित्रपटाचा फर्स्ट लुक सर्वांसमोर आला आहे. या चित्रपटाची निर्मिती स्टुडिओ ग्रीन के.ई. ज्ञानवेलराजाने यूव्ही क्रिएशन्स वामसी-प्रमोद यांच्या सहकार्याने केली आहे. ते गाजलेल्या शिवा या चित्रपटाचे सुद्धा दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सूर्या आणि दिशा पटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडे, त्याने 'पथू थाला' सारखे अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देऊन दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात खूप नाव कमावले आहे. गेल्या 16 वर्षांत स्टुडिओ ग्रीन के.ई. ज्ञानवेल राजाने सिंघम, परुथी वीरण, सिरुथाई, कोंबन, नान महान अल्ला, मद्रास, टेडी यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत.

Tags:    

Similar News