मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सर्वांनाच माहित आहे . पण सोनाली कुलकर्णी मराठी सोबतच आता हिंदी मध्ये सुद्धा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सोनाली कुलकर्णीचे तिच्या तरुणाईतील हिंदी सिनेमे सुद्धा आणि त्या सिनेमातील गाणी सुद्धा आजही तिच्या चाहत्यांच्या ओठांवर आहेत .
पण इतक्या वर्षात तिच्या अभिनयात आणि दिसण्यात झालेला बदल दिसून येत आहे.तिने आपला एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे . निमित्त आहे लग्नाच्या वाढदिवसाचे... हे आहेत फोटो...
सोबतच सोनालीने तिच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे, की तिच्या पतीचा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस त्याचबरोबर तिच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा एकाच दिवशी येतो. त्यामुळे आपल्या स्टोरीला सोनालीने आपल्या आई वडिलांचा हा फोटो शेअर केला आहे.
लग्नाचा दिवस हा जगातील प्रत्येक माणसासाठी जसा महत्त्वाचा ठरतो, अगदी त्याचप्रमाणे सोनाली कुलकर्णीने ही तिचे हे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत . तुम्हाला सोनाली नवीन हिंदी सिरीज मध्ये सुद्धा दिसणार आहे . स्कूल ऑफ लाइज , त्याचबरोबर हॉटस्टार वर अजून सुद्धा एक नवी सेरीज येणार आहे. ज्यामध्ये सोनालीचा अभिनय आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ? प्रतिसादात नक्की कळवा ...