गुलीगत डायलॉग मारत सोशल मीडियावर फेमस झालेला तसेच बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. सूरजने बिग बॉसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. अनेकजण त्याला भेटायला स्वेच्छेने त्याच्या गावी जात आहेत, त्याला भेटत आहेत. अशातच आता बिग बॉसमध्ये त्याच्या सोबत असलेली को-कंटेस्टंट किल्लर गर्ल जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाणच्या गावी जाऊन पोहोचलीय. या दोघांनी त्यांच्या भेटीचे काही फोटो शेअर देखील केले होते. आता त्यांचे व्हिडीओदेखील इन्स्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहेत. यात जान्हवी सूरजचे किस्से सांगताना दिसत आहे.
"बिग बॉसच्या ७० दिवसांच्या प्रवासात सूरज नॉमिनेट झाल्यावर खूप निवांत असायचा. आम्ही सगळे नॉमिनेशननंतर टेन्शनमध्ये असायचो, ट्रॉफीच्या वेळी पण म्हणायचा, मला माहीत आहे माझीच ट्रॉफी आहे. इतकं रिलॅक्स कोणी कसं असू शकतं..आम्ही नॉमिनेट झाल्यावर डोकं धरून बसायचो. बापरे, आता नॉमिनेट झालो, आता वोट पडतील, या भाईला टेन्शनच नाही कसलं. शेवटपर्यंत त्याला टेन्शनच नव्हतं, इतका तो रिलॅक्स होता. असा आत्मविश्वास पाहिजे सगळ्यांमध्ये.” असं जान्हवीने सूरजच्या घरच्यांना सांगितलं.