बापरे बाप..सलमानला चावला साप..

Update: 2021-12-26 07:10 GMT

अभिनेता सलमान खानला काल शनिवारी साप चावल्याची बातमी समोर आली आहे. सलमान खान याला रात्री ३ वाजता मुंबईतील कामोठे परिसरातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. काल रात्री सलमान त्याच्या कुटुंबासह पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवर ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेला होता.

उपचारानंतर सलमान आज सकाळी 9 वाजता त्याच्या फार्म हाऊसवर परतला आहे. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. पनवेल मध्ये ज्या भागात सलमानचे फार्म हाऊस आहे, तो परिसर डोंगर आणि जंगलाने वेढलेला आहे. परिसरात अनेकदा साप आणि अजगर येतात. काल संध्याकाळी सलमान चवलेला साप बिनविषरी असल्याने त्याला आला रुग्णालयातुन सोडण्यात आले आहे.

Tags:    

Similar News