प्रियांका आणि निक जोनास घटस्फोट घेणार का? प्रियांकाने केला खुलासा...

Update: 2021-11-23 05:47 GMT
प्रियांका आणि निक जोनास घटस्फोट घेणार का? प्रियांकाने केला खुलासा...
  • whatsapp icon

प्रियंका चोप्राने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमधून तिच्या नावातून 'चोप्रा' आणि 'जोनास' ही आडनावे काढून टाकली. आणि तेव्हापासून प्रियांका आणि निक जोनास घटस्फोट होणार की काय आशा चर्चा चालू झाल्या. मात्र, दरम्यान, निक जोनासने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर प्रियांकाने कमेंट करत आता घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

Full View

मला तुझ्या कुशीत मरायचे आहे: प्रियांका

निक जोनासने अलीकडेच जिममध्ये वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करताना प्रियांकाने लिहिले की, "अरे! मला तुझ्या कुशीत मरायचे आहे." प्रियांकाने या कमेंटमध्ये सांगितले की, तिचे निक जोनासवर खूप प्रेम आहे आणि दोघे वेगळे होत नाहीत.

Full View

प्रियांकाने तिचे आडनाव काढून चाहत्यांना गोंधळात टाकले. प्रियांका आणि निकच्या लग्नाला १ डिसेंबरला ३ वर्षे पूर्ण होत आहेत. पण, यापूर्वी प्रियांका चोप्राने इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमधून 'जोन्स' आडनाव काढून चाहत्यांना गोंधळात टाकले होते. यानंतर निक आणि प्रियांकाच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनीही जोर धरला होता.

Tags:    

Similar News