रवींद्र महाजनी यांनी झुंज या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि या चित्रनगरीत एक सितारा चमकायला सुरुवात झाली. रवींद्र महाजनी यांनी एकापाठोपाठ एक मराठी हिट चित्रपट दिले.
व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंज या चित्रपटाद्वारे १९७५ साली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
लक्ष्मी
दुनिया करी सलाम
गोंधळात गोंधळ
मुंबईचा फौजदार
या चित्रपटातील त्यांची स्वतःची वेगळी भूमिका त्यांनी मांडली आहे. मुंबईच्या फौजदारी चित्रपटातुन त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. रंजना देशमुख सोबत मुंबईचा फौजदार चित्रपटात रवींद्र महाजनी यांची भूमिका मराठी प्रेक्षकांना वेड लावून गेली. मराठी सोबतच गुजराती आणि हिंदी चित्रपटात सुद्धा रवींद्र महाजनी यांनी काम केले आहे. लाईट ,कॅमेरा ,ऍक्शन चं आयुष्य आजतागायत जगलेल्या नटाचा शेवट मात्र अंधारात झाला ... आणि संपूर्ण चित्रपट सृष्टी हळहळली ...