राखी सावंतला होणार अटक;हे आहे कारण.

Update: 2024-01-14 12:31 GMT

प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतला मुंबई सत्र न्यायालयाने आज अंतरिम जामीन नाकारला आहे. राखी सावंतवर तिच्या माजी पती आणि बिझनेसमन आदिल खानसोबतचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी आयपीसी कलम 499 (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

राखी सावंतने 25 ऑगस्ट 2023 रोजी एका टीव्ही शोमध्ये हे व्हिडिओ दाखवले होते. हे 25 ते 30 मिनिटांचे व्हिडिओ होते ज्यात दोघंही इंटिमेट झालेले दिसत आहेत. यानंतर आदिल खानने राखी सावंतविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.

राखी सावंतने या प्रकरणात जामीन अर्ज केला होता. तिने आपल्या याचिकेत म्हटले होते की आदिल खानवर आधीच मारहाणसहित अनेक आरोप आहेत. माझ्याविरोधात असा कोणताही आरोप नाही आणि मी चौकशीत सहकार्य केलं आहे.




 


मात्र आदिल खानच्या वकिलांनी राखी सावंतच्या याचिकेला विरोध केला होता. त्यांनी म्हटले होते की हे व्हिडिओ राखी सावंतने व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. या व्हिडिओंमुळे आदिल खानला समाजात बदनामी झाली आहे.




 


दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राखी सावंतचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने सांगितले की, "घटनेतील तथ्य, आरोप आणि परिस्थितीवर विचार करुन अंतरिम जामीन नाकारण्यात येत आहे."

या निर्णयामुळे राखी सावंतला अटक होण्याची शक्यता आहे. ती हायकोर्टात जामीन मिळवण्यासाठी याचिका करणार आहे.

Tags:    

Similar News