सोशल मिडियाचं क्रेज साऱ्या जगाला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लोक आपल्याला सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. आणि सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर पैसे कमावणे आजकाल खूपच लोकप्रिय आणि फायदेशीर बनलं आहे. अनेक कंटेंट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स विविध प्रकारच्या व्हिडिओ, ब्लॉग, आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या माध्यमातून चांगले पैसे कमावतात. यूट्यूब आणि इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म्सवर लोक आपल्या आवडीनुसार कंटेंट तयार करून फॉलोअर्स आणि व्ह्यूज मिळवतात. तुम्ही आतापर्यंत अनेक सोशल मिडिया एन्फ्लूएंसर आणि यूट्यूबरबद्दल ऐकलं असेल, पण सर्वात श्रीमंत महिला यूट्यूबरबद्दल आपण पाहणार आहोत.
भारतातील सर्वात श्रीमंत महिला यूट्यूबर
यूट्यूबर निशा मधुलिका या भारतातील प्रसिद्ध कंटेट क्रिएटर्सपैकी एक आहेत. आणि निशा मधुलिका या सर्वात श्रीमंत महिला यूट्यूबर आहेत. निशा मधुलिका भारतीय यूट्यूबच्या जगातील एक अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी महिला यूट्यूबर आहेत, ज्यांनी आपल्या पाककृतींसाठी विशेष ओळख मिळवली आहे. निशा मधुलिका या शाळेत शिक्षिका होत्या. मुलांना शिकवत असताना त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार केला. 2011 मध्ये आपलं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. त्यांचं मुख्य लक्ष भारतीय शाकाहारी पदार्थांच्या पाककृतींवर होतं, आणि त्यांच्या व्हिडिओंमध्ये त्या घरातील साध्या सामग्रीतून विविध प्रकारच्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी जेवण तयार करण्याचे साधे आणि सोप्या रेसिपी बनवतात. निशा मधुलिका मुख्यतः शाकाहारी पदार्थांची रेसिपी शेयर करतात. त्यांच्या चॅनेलवर तुम्हाला विविध प्रकारचे भात, रोटीस, हलव्यांचे पदार्थ, मिठाई, आणि इतर खास भारतीय डिशेस दिसतात. त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे च्या सर्व पद्धती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगतात, ज्यामुळे नवीन लोकांना देखील पदार्थ बनवण्यास सोप्पं जातं.
भारतातील टॉप यूट्यूब शेफच्या यादीत सामील
निशाने यूट्यूब वर सतत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि 2014 पर्यंत त्या भारतातील टॉप यूट्यूब शेफच्या यादीत सामील झाल्या. 2017 मधील सोशल मीडिया समिट आणि अवॉर्ड्समध्ये निशा मधुलिकाला यूट्यूब कुकिंग कंटेंट क्रिएटर म्हणून नामांकन मिळालं. निशा मधुलिका यांचा शिक्षक ते यूट्यूब असा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरला आहे. द इकॉनॉमिक टाइम्सने भारतातील टॉप 10 यूट्यूब सुपरस्टार्सच्या यादीत निशा मधुलिकांचा समावेश केला होता. व्होडाफोनच्या वुमन ऑफ प्युअर वंडर कॉफी टेबल बुकमध्येही त्यांचा समावेश होता. निशा यांनी 2020 मध्ये यूट्यूबवर 10 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आणि यासाठी तिला यूट्यूबकडून डायमंड प्ले बटणही मिळालं.