"माझी तुझी रेशीमगाठ"या मालिकेतून श्रेयस तळपदे बाहेर पडणार ?

'माझी तुझी रेशीमगाठ'या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.नेहा,परी आणि यश या तिघांच्या भूमिकेने एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे.;

Update: 2022-07-27 10:06 GMT

 'माझी तुझी रेशीमगाठ'या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.नेहा,परी आणि यश या तिघांच्या भूमिकेने एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. यापैकी यशची भूमिका साकारत असणारा अभिनेता श्रेयस तळपदे आता बॉलिवूडमधील एक बहुचर्चित चित्रपटमधून झळकणार आहे.कंगना रानौतच्या इमर्जन्सी या चित्रपटात तो महत्वाची भूमिका साकारत आहे.

आतापर्यंत चार वेळा राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घालणारी हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच आपल्या भूमिका उत्तम निभावताना दिसते. झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जय ललितांची भूमिका तिने हुबेहूब साकारली होती .त्यामुळे ती आणि तिच्या भूमिका लोकप्रिय होतात. नेहमीच प्रेक्षकांमधून चांगला प्रतिसाद मिळतो.कंगना सध्या स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका तिच्या आगामी इमर्जन्सी या हिंदी चित्रपटामध्ये साकारत आहे.काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांचा लोक सुद्धा रिलीज करण्यात आला होता.या चित्रपटामध्ये जयप्रकाश नारायण यांची भूमिका अनुपम खेर साकारणार आहेत.

याच चित्रपटातील अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार आहे.

याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, "अटलजी हे सर्वात आदरणीय, बुद्धिमान, विद्वान, प्रभावशाली आणि भारतातील तसेच जगभरातील सर्वात प्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांना पडद्यावर साकारणे ही केवळ मोठी गोष्ट नाही तर एक मोठा सन्मान आणि निश्चितपणे एक मोठी जबाबदारी आहे. मला आशा आहे की मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेन."

काही दिवसांपूर्वी कंगनाने 'इमर्जन्सी'चा टीझर शेअर केला होता. या टीझरने अनेकांचे लक्ष वेधले. इमर्जन्सी चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनाची आहे. चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केलं आहे.

Tags:    

Similar News