Navratri Special : 'My Wife, My Durga!' स्वप्नील जोशीची बायकोसाठी खास पोस्ट
अभिनेता स्वप्नील जोशी याने पत्नीला दुर्गा म्हटलं असून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. पत्नीसाठी त्याने खास इंस्टावर पोस्ट लिहीली असून "My Wife, My Durga! माझा आरसा! खूप fun, खूप happy, आणि थोडी eccentric. माझे गुणदोष मला तोंडावर सांगते, हातचं न राखता… जी माझा परिवार खंबीरपणे सांभाळते म्हणून कामाचे वाट्टेल तेवढे तास, वेळा, स्ट्रेस याचं काहीच वाटत नाही. जी तिचं घर सोडून माझ्या घरात आली आणि तिचे जन्मदाते नसलेल्या आईवडिलांना भरभरून माया दिली. घरातल्या सगळ्यांची काळजी, विचारपूस आणि प्रेम तर इतकं करते कि थक्क व्हायला होतं. असे प्रसंग कमी येतात की बसून तिला सांगावं, तिचं महत्व… कृतज्ञता व्यक्त करावी..," असं पोस्ट मध्ये म्हटलं आहे.