'हिंदू-मुस्लिम' आमच्या प्रेमात कधीच आडवं आलं नाही..

Update: 2023-04-06 03:09 GMT

आंतरधर्मीय विवाह आजही अनेकांना न पटणारी गोष्ट आहे. एखाद्या मुला-मुलीने असं काही जात, धर्म, पंथ याचा विचार न करता लग्न केलं तर अनेक वेळा घरच्यांनी आयुष्यभरासाठी नाती तोडल्याच्या घटना आपल्या आसपास अनेक आहेत. आपल्या पोटच्या पोरा-पोरी पेक्षा इथं धर्माला, प्रतिष्ठेला महत्त्व देणारे लोक अनेक आहेत. त्यात हिंदू मुस्लिम असं असेल तर विचारूच नका. पण बॉलीवूड मध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांनी अगदी सरळ भाषेत बोलायचं तर फाट्यावर मारत आंतरधर्मीय विवाह केले आहेत. आज आम्ही सुद्धा तुम्हाला अशीच एक भन्नाट लव्ह स्टोरी सांगणार आहे.. 

 तर आपण ज्यांच्याविषयी बोलतॊ आहोत त्यांचं नाव आहे अभिनेता मनोज बाजपेयी व अभिनेत्री शबाना यांच्याविषयी.. मनोज बाजपेयी यांनी नुकतेच त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाविषयी सांगितले. ते म्हणाले की ते त्यांच्या घरी कधीही धर्माची चर्चा करत नाहीत. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना घरच्यांचा विरोध झाला नाही. मनोज बाजपेयी पुढे म्हणतात., तो गर्विष्ठ हिंदू आहे तर त्याची पत्नी शबाना देखील गर्विष्ठ मुस्लिम आहे. त्यांच्या नात्यात धर्म कधीच आडवा आला नाही. शबाना एकमेकांच्या धार्मिक भावनांचा खूप आदर करतात.

मी ब्राह्मण घराण्यातील होतो, पण कोणाचाही आक्षेप नव्हता..

बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत मनोज म्हणाला, 'आमच्यातील नातेसंबंध मूल्यांमुळे सुरू आहे. जर आपण एकमेकांच्या मूल्यांचा आदर केला नाही तर आपले वैवाहिक जीवन चालणार नाही. मी सरंजामशाही ब्राह्मण कुटुंबातून आलो. शबाना देखील प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाला माझ्या घरातील कोणीही आक्षेप घेतला नाही. माझ्या पत्नीच्या धर्माबद्दल ते कधीच बोलत नाही. तर प्रेम हे प्रेम असत... मग त्याला जात धर्म, पंथ हे सगळे रंग माणसाने दिले आहेत. पण आता नवीन पिढी या सर्व जातीपातीच्या भिंती मोडून काढत आहेत हि फार आनंदाची गोष्ट आहे..

Tags:    

Similar News