Maharashtra Shaheer अगबाई अरेच्चा मधील हि चिमुकली आहे कोण? जी साकारतेय महत्वाची भूमिका
शाहीर हे आपल्या गाण्यातून अनेक प्रश्नांवर आवाज उठवतात. कधी त्यांच्या शब्दांनी ,तर कधी त्यांच्या सुरांनी काळजाचा ठोका चुकतो .यापैकीच कृष्णराव गणपतराव साबळे .म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे . यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांचे नातू आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे शाहीर साबळे यांच्या जीवनावर चित्रपट करत आहेत. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहीर साबळे यांच्या पत्नीची भूमिका कोण साकारेल ? या प्रश्नाला केदार शिंदे यांनी उत्तर दिले आहे .
प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात त्याच्या पत्नीची साथ हि महत्वाची असते . संघर्षात भक्कम साथ असणाऱ्या शाहीर साबळे त्यांच्या पत्नी 'भानुमती कृष्णकांत साबळे' यांची भूमिका केदार शिंदे यांची मुलगी म्हणजे शाहीर साबळे यांची पणती करणार आहे . तिचं नाव सना शिंदे असे आहे . सना मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. चित्रपटात सना भानुमती कृष्णकांत साबळे यांची भूमिका वठवणार आहे.
चित्रपटातील सनाच्या लूकचा फोटो शेअर करत केदार शिंदे यांनी लिहिले, "आज 3 सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं.... सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'. पणजीच्या भूमिकेत पणती."
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पुढच्या वर्षी 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार असून अजय-अतुलचे सुमधुर संगीत चित्रपटाला असणार आहे.महाराष्ट्राला आपल्या शायरीने वेड लावलेल्या शाहीर साबळे यांच्या या चित्रपटाने नक्कीच त्यांचा इतिहास पुन्हा नव्या पिढीला प्रोत्साहन देईल .