किंग ऑफ बॉलिवूड अर्थात शाहरुख खान हा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचा अगामी चित्रपट 'पठाण' मुळे चर्चेत आहे. त्यानंतर आज शाहरुख खानने एक ट्विट केले आहे. त्याच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आहे. काय आहे हे ट्विट? तर शाहरुखने म्हंटलं आहे " आप सबका टाईम अच्छा चल रहा हैI मगर याद रखिये शेरोक का जमाना होता हैI" आता या ट्विटचा नक्की अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. शाहरुख खानने हे ट्विट केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये त्याला हजारो लाईक आणि रिट्विट्स मिळाल्या आहेत.
इतकंच नाही तर याच पोस्ट सोबत शाहरुखने एक ऑडिओ क्लिप सुद्धा शेअर केली आहे. ज्यामध्ये शाहरुख खान स्वतः त्याच्या आवाजामध्ये एक गाणं गातोय. आणि या गाण्यामध्ये त्याने काही वेगवेगळ्या ब्रँड्सची नावे घेतली आहे. आता हा सर्व प्रकार काय आहे? आता या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? शाहरुखने शेअर केलेली पोस्ट त्याचं कॅप्शन आणि खाली त्याच्या आवाजातील हे गाणं. त्यामुळे खरं तर शाहरुख खानचे सर्व फॅन्स बुचकळ्यात पडले आहेत. पण काही काळजी करू नका. काहीही झालेलं नाही. शाहरुख खानने हे जे काही केलं आहे ते सर्व या ब्रँडच्या प्रमोशन साठी केलं आहे. शाहरुख खानने ही पोस्ट करत सर्व फॅन्सना पुन्हा एकदा बुचकळ्यात तर पाडलचं पण आता काय झालं म्हणून अनेकांच्या काळजाचे ठोके देखील चुकवले.
हे गाणं तुम्हाला Spotifyi वरती सुद्धा ऐकायला मिळणार नाही असं शाहरुख शेवटी म्हणतो यावर Spotifyi India ने देखील रिट्विट केले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे "ठीक है हम यहीं पे सुन लेंगे, बार बार, क्यूंकि आप हो तो, दिल तो पागल है|"
झोमॅटोने देखील रिट्विट करत म्हंटल आहे "आमचं नाव तुम्ही गात आहात हे आम्ही ऐकत आहोत"
"हमारे एडमिन की लाइफ में अब ओनली खुशी, नो गम" असं म्हणत कॉइन स्वीच कुबेर या कंपनीने देखील रिट्विट केलं आहे.
या सगळ्या कंपन्यांची नावे शाहरूखने या गाण्यामध्ये घेतली आहेत आणि हे सर्व त्याने या ब्रँड्सच्या प्रमोशनसाठी केले आहे.