आजीची भूमिका करणाऱ्या अनेक अभिनेत्री पण पाहिल्या आहेत . पण नेहमीच तरुण वयापासून वृद्ध होईपर्यंत प्रत्येक भूमिका उत्तमरीत्या निभावणाऱ्या अभिनेत्रींनपैकी एक म्हणजे कुसुम नवाथे.कुसुम नवाथे यांनाच चित्रा म्हंटल जाते. पण या चित्रनगरीत स्वतःच्या स्वप्नांचं चित्र रेखाटलेली चित्रा यांचं निधन झालं आहे . मराठी चित्रपटसृष्टीत ५० च्या दशकात त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण केला .
कुसुम नवाथे यांनी पन्नासच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. त्यांचे चित्रपट तुफान हिट ठरले होते.'बोक्या सातबंडे' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.'राम राम पाव्हणं, 'वहिनीच्या बांगड्या', 'गुळाचा गणपती', 'बोलविता धनी', 'उमज पडेल तर' इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे आणि हे चित्रपट प्रचंड गाजले आहेत.त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले.
वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी टिंग्या या चित्रपटात भूमिका साकारली होती. गदिमांनी कुसुम यांचे नाव बदलून चित्रा असे ठेवले होते. त्यांनी दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी विवाह केला होता.त्या गेल्या काही दिवसांपासून सांताक्रूझच्या सरला नर्सिंग होम मध्ये राहात होत्या. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.