या तरुणींच्या प्रेमात भारतीय तरुण झालेत वेडे..

चित्रपट सृष्टीत चित्रपटावर प्रेम करणारे अनेक जण आहेत. सोबतच सिनेप्रेमी सिनेमांच्या हिरो-हिरोईनवरही तेवढंच प्रेम करतात. आपल्या अस्सीम सौंदर्याने आणि घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. चाहते सिने सृष्टीतील अनेक अभिनेत्रीवर प्रेम करतात आणि क्रश म्हणून उच्चारतात. अश्याच काही नॅशनल क्रश झालेल्या अभिनेत्रींनी भारतीय तरुणांना वेड लावलं आहे..

Update: 2023-02-17 07:58 GMT

चित्रपट सृष्टीत चित्रपटावर प्रेम करणारे अनेक जण आहेत. सोबतच सिनेप्रेमी सिनेमांच्या कलाकारांवर  तेवढंच प्रेम करतात. आपल्या अस्सीम सौंदर्याने आणि घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. चाहते सिने सृष्टीतील अनेक अभिनेत्रीवर प्रेम करतात आणि क्रश म्हणून उच्चारतात. अश्याच काही नॅशनल क्रश झालेल्या अभिनेत्रींनी भारतीय तरुणांना वेड लावलं आहे..


1) साऊथ अभिनेत्री रश्मिका मंधाना :

अभिनेत्री रश्मिका मंधाना हिने खूप कमी कालावधील साऊथ सोबतच बॉलीवूड चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुन रश्मिका मंधाना ही राष्ट्रीय क्रश बनली आहे. चित्रपट सृष्टीत रश्मिका मंधानाला नॅशनल क्रशचा टॅग दिला गेला. रश्मिकाने प्रचंड कष्टाच्या जोरावर तिचे यश मिळवले आहे. भारतासह जगभरात रश्मिकाचे लाखो चाहते आहेत.


2) मानुषी छिल्लर : मानुषी छिल्लर ही भारतीय मॉडेल आहे. मानुषी ही २०१७ च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. या पूर्वी तिने २५ जून २०१७ रोजी फेमिना मिस इंडिया २०१७ हा किताब मिळवला होता. मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भारतीय महिला आहे. सौंदर्याने वेडं लाऊन तरुणांमध्ये नॅशनल क्रश झालेली ही मिस वर्ल्ड तिच्या हसण्याने घायाळ करते.


३) प्रिया प्रकाश वारीयर : प्रिया प्रकाश वारीयर ही एक मॉडेल आहे. त्याच बरोबर ती एक अभिनेत्री सुद्धा आहे. सोशल मीडियावर तिने सर्वाधिक लोकांचे लक्ष वेधले. ओरु अदार लव या मल्याळम चित्रपटातील तिच्या एका २८ सेकंदांच्या एक व्हिडिओ क्लिप खूप प्रसिद्ध झाला आहे. ट्रेलरमध्ये ती प्रियकराला आपली भुवई आणि डोळ्यांनी प्रेमळ इशारे करते. या विडियो नंतर तिला क्रश म्हणून घोषित करण्यात आले.


४) दिशा पटानी : दिशा पटानी ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. दिशाच्या करिअर ची सुरवात २०१५ साली प्रदर्शित झालेल्या लोफर नावाच्या तेलुगू चित्रपटाद्वारे झाली. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा दिशाचा पहिला हिंदी चित्रपट होता. २०१६ सालच्या बेफिक्रा नावाच्या व्हिडियोमध्ये ती टायगर श्रॉफसोबत चमकली. आणि तिच्या बोल्ड व स्माइल मुळे लाखों तरुण तिच्या प्रेमात पडले. त्या नंतर तिला क्रश म्हणून बोलण्यास सुरवात केली.


५) साक्षी मलिक : साक्षी मलिक हरियाणा सारख्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये वाढली, जिथे आजही भारतातील सर्वाधिक भ्रूणहत्या केल्या जातात. अशा राज्यात 3 सप्टेंबर 1992 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. साक्षी ही एक फ्रीस्टाइल कुस्तीपटू आहे. वयाच्या 7 व्या वर्षापर्यंत ती आपल्या आजोळी वाढली. 2004 साली वयाच्या 12 व्या वर्षी तिने कुस्ती करण्यास सुरवात केली. यानंतर हिने रियो दि जानेरो येथे २०१६ रोजी उन्हाळी ऑलिंपिक मध्ये ५८ किलो वजनी गटात किर्गि‍झस्तानच्या अईसुलू टिनीबेकोवाला, ८-५ असे हरवून कांस्यपदक पटकावले. ५८ कि.ग्रा. श्रेणीत काश्यपदक जिंकले आणि ति भारतातील ऑलिम्पिक कुस्तीपटू बनली. या नंतर तिची चर्चा इतकी झाली की सर्व तरुणांनी तिला क्रश म्हणून घोषित केले.



Tags:    

Similar News