दिल्ली मेट्रोमध्ये तरुणींचा अश्लील डान्स! व्हिडिओ होतोय व्हायरल...
चालू मेट्रोमध्ये दोन तरुणींचा 'अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे' या गाण्यावर अश्लील डान्स!;
तुम्ही रेल्वे आणि बसमधील भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होतांना पाहिले असतील. तसे सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक वेळा दिल्ली,मुंबई,कोलकाता बंगलोर मेट्रोमधील विचित्र आणि अतरंगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी दिल्ली मेट्रोमध्ये रंगपंचमी खेळताना दिसत आहेत. मेट्रो ट्रेनच्या मधील पॅसेजमध्ये या तरुणी बसलेल्या दिसत असून 'अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे...' या बॉलिवूड गाण्यावर अतिशय अश्लील पद्धतीचा ठेका धरल्यामुळे नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) व्हिडीओ तुफान (Video Viral) व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे. याचे कारण दोन तरुणींचा दिल्ली मेट्रोमधील एक अश्लील कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. होळीच्या निमित्ताने या तरुणींना हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये या दोन्ही तरुणी बॉलिवूडच्या गाण्यावर अश्लील डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एका वेगळ्या चर्चेत आली असून हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यामुळे दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेचा मुद्दा ठरली आहे. दिल्ली मेट्रो आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही दिल्ली मेट्रोमधील भांडणाचे, अश्लील कृत्याचे व्हिडीओ कमी होण्याचं नाव घेत नाहीयत.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. चालू मेट्रोमध्ये या दोन तरुणी 'अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे या गाण्यावर अश्लील ठेका धरत एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. आणि आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत असून हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे.
सामना ऑनलाइनने हा व्हिडिओ त्यांच्या instagram वर शेअर केला असून अनेक यूजर्सनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कॉमेंट मध्ये एक युजर म्हणतो 'संस्कार वया पेक्षा जास्तच आहेत यांचे' तर पाठोपाठ दूसरा यूजर 'घरचे संस्कार महत्वपूर्ण असतात' अशी प्रतिक्रिया देतांना दिसत आहे.
दरम्यान, चालू मेट्रोमध्ये या तरुणींनी हा विचित्र व्हिडीओ चित्रीत केल्याचं तुम्ही पाहू शकता. मात्र, कोचमधील इतर प्रवाशांनवर या कृत्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाहीय, जेवढा सोशल मिडिया यूजर्सना होतोय. मेट्रो कोचमधील इतर प्रवासी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे. पण सोशल मीडिया युजर्सने या तरुणींचा चांगलाच समाचार घेत आहेत