"सर मन लागत नाही अभ्यास कसा करू" शाहरुख खानच्या चाहत्यांसोबत ट्विटरवर खास गप्पा
अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली. ट्विटरवर शाहरुख खानने रिलीज डेट जाहीर केल्यानंतर ट्विटरवर पठाण #pathan हा ट्रेंड सुरू झाला. मागील अनेक दिवसांपासून शाहरुखच्या या नवीन चित्रपटाची चर्चा होती. पण अनेक अडचणींमुळे या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यास अडचणी येत होत्या. जेव्हा त्यांचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आला त्यानंतर शाहरुख समाजमाध्यमांपासून अलिप्त झाले होते. त्यानंतर काल त्यांनी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करत अगदी आपल्या खास शैलीत चाहत्यांशी संवाद साधला..;
बुधवारी शाहरुख खानने ( Shah Rukh Khan ) त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचा टीझर आणि रिलीज डेट शेअर करताच 'किंग खान' (#KingKhan) ट्विटरवर ट्रेंड करू लागला. चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे अनेक चाहत्यांनी शाहरुखच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. शाहरुखने अचानक ट्विटरवर चाहत्यांशी बोलायला सुरुवात केल्याने या उत्साहाला काही अंत नव्हता. बऱ्याच दिवसांनी शाहरुखने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. त्यांनी आस्क मी एनीथिंग सेशन आयोजित केले होते, ज्यामध्ये चाहत्यांनी शाहरुखला सर्व प्रकारचे प्रश्न विचारले. पण शाहरुखनेही त्याच्याच शैलीत मजेशीर उत्तरं दिले.
जेव्हा एका चाहत्याने शाहरुखला एक सल्ल्या दिला की, 'तुम्ही चित्रपटात येत राहा बातम्यांमध्ये नको' असे विचारले असता शाहरुख खानाने त्याला काय उत्तर दिले माहित आहे का? शाहरुखने लिहिले, 'ठीक आहे, पुढच्या वेळी मी 'खबरदार' होईल #pathan'
Ok next time I will be 'Khabardaar' #Pathaan https://t.co/ZSdMxjTpRm
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 2, 2022
याचवेळी, जेव्हा दुसऱ्या एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, तुम्ही आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट पाहिला आहे का? तेव्हा शाहरुख म्हणतो, 'अरे यार, आमिर म्हणतो, पहिल्यांदा 'पठाण' दाखव. आशा प्रकारे सर्व प्रकारच्या प्रश्नांची शाहरुख खानाने अगदी मजेशीर अगदी त्याच्या खास शैलीत उत्तरे दिली आहेत.
Arre yaar Aamir kehta hai pehle Pathaan dikha!! #Pathaan https://t.co/dBWCqD7g05
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 2, 2022
'सर एवढ्या उशिरा का पिक्चर रिलीज करत आहात लवकर कराना.. असे एका चाहत्याने विचारताच शाहरुख खानने अत्यंत मजेशीर उत्तर दिलं. शाहरुख खान म्हणाला, 'अर्धाच पिक्चर रिलीज करू का?' शाहरुखने असे उत्तर रिट्विट केल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये हस्यकल्लोळ निर्माण झाला..
Aadhi kar doon kya!!!?? https://t.co/BlLJh62kZ2
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 2, 2022
जेव्हा एका चाहता शाहरूखला विचारले की "इतके दिवस कुठे गायब होते?" तर शाहरुख म्हणाला, 'विचारात.'
Khyaalon mein…. https://t.co/AT15xPcCtk
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 2, 2022
शाहरुखचा शेवटचा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला. आणि 'झिरो' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. त्यानंतर शाहरुखने काही काळ चित्रपटांमधून ब्रेक घेतला. गेल्या वर्षी जेव्हा शाहरुखचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आला होता, तेव्हा शाहरुखने सर्व समाजमाध्यमांपासून आणि मीडियापासूनही स्वतःला लांब ठेवले होते. तेव्हापासून चाहते शाहरुख आणि त्याच्या चित्रपटासाठी आतुर झाले होते.
एका चाहात्याने तर त्याला 'अभ्यास होत नाही अभ्यासात मन लागत नाही असा प्रश्न विचारला' यावर शाहरुख खानने अत्यंत मजेशीर असे उत्तर देत त्याला सांगितले की 'दिमाग ट्राई कर शायद वर्क करेगा, मन प्यार के लिए रखं #Pathan' असे उत्तर दिले आहे.
Dimaag try kar shaayad work karega…Mann pyaar ke liye rakh. https://t.co/TG5xGvwNRD
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 2, 2022
'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याची कथा सिद्धार्थ आनंद यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे. आदित्य चोप्रा 'पठाण'चा निर्माता आहे. या चित्रपटात सलमान खानही कॅमिओमध्ये दिसणार आहे. 'पठाण'मध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्त शाहरुख खानने बऱ्याच दिवसानंतर ट्विटर वर आपल्या