मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्षिती जोगला ओळखलं जातं. आजवर तिने लोकप्रिय मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक मुद्द्यांवर क्षिती आपलं स्पष्ट मत मांडत असते. वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने हेमंत ढोमेशी लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर क्षितीला एका कार्यक्रमात आपण मंगळसूत्र का घालत नाही असा सवाल विचारणाऱ्याला क्षितीने त्याला सडेतोड उत्तर दिले. यावरून घडलेला एक प्रसंग अभिनेत्रीने नुकत्याच ‘आरपार’ युट्यूब चॅनेलच्या ‘वूमन की बात’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. लग्नानंतर मंगळसूत्र घालायचं की नाही? क्षिती जोगने मांडलं स्पष्ट मत;