'गदर 2'ची माऊथ पब्लिसिटी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत त्याची कमाई चांगली होऊ शकते. शिवाय ॲडव्हान्स बुकिंगचाही त्याला फायदा मिळू शकतो. मात्र सोशल मीडियावरील सकारात्मक आणि नकारात्मक रिव्ह्यू वाढत गेल्यास हा चित्रपट फारशी कमाई करू शकणार नाही. आणि आजच अक्षय कुमार चा ‘OMG 2’ हा चित्रपट ही रिलीज झाला आहे. आता प्रेक्षका पुढे दोन पर्याय असल्यामुळे गदर २ आणि ‘OMG 2’ दोन्ही चित्रपटाला फटका बसु शकतो. परंतु रेटिंग च्या बाबतीत OMG 2’ ह्या चित्रपटाला प्रेक्षकाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
22 वर्षांपूर्वी चा ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता आणि आजुन ही कथा प्रेक्षकाच्या आवडत्या लिस्ट मध्ये आहे. तारा सिंग आणि सकिना यांची क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तब्बल 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिनाची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र आली आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शुक्रवारी सकाळपासून ट्विटरवर त्यावरून चर्चा सुरू आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.