मिताली बोरूडे आणि अमित ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस!

Update: 2021-01-27 08:35 GMT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चिरंजीव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे व त्यांची पत्नी मिताली बोरुडे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस. चला जाणून घेऊया या क्यूट कपलबद्दल काही खास गोष्टी!

अमित यांचा विवाह त्यांच्याच महाविद्यालयीन मैत्रिण असलेल्या मिताली बोरुडे यांच्यासोबत २७ जानेवारी २०१९ ला पार पडला. अमित हे तेव्हा एका मोठ्या आजारपणातून नुकतेच बरे झाले होते. त्यांच्या या आजारपणात मिताली यांनी त्यांना खूप मोठा आधार दिला होता. अमित यांच्या आजपणामुळे राज ठाकरे देखील तेव्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून काहीसे बाहेर पडले होते. मात्र अमित हे पूर्णपणे बरे होताच. त्यांचा राज यांनी अमित यांचा विवाह लगेचच मिताली यांच्याशी करून दिला.

अमित यांची पत्नी मिताली या राज ठाकरे यांची कन्या उर्वशी यांच्या जवळच्या मैत्रिण तर आहेतच, पण त्याच बरोबरीने उर्वशी आणि मिताली या दोघी मिळून एक बुटीक चालवतात. ज्याचं नाव 'द रॅक' असं आहे. मितालीने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. मिताली यांची अमित ठाकरे यांच्याशी ओळख उर्वशी यांच्यामुळेच झाली. हळूहळू या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.



अमित आणि मिताली लग्नापूर्वी पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मितालीने १२ वीची परीक्षा रुईया महाविद्यालयातून दिली असून पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. अमित हे १२ वी पर्यंत पोद्दार महाविद्यालयात होते. १२ वी नंतर दोघेही मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयात एकत्र शिकायला होते. बाहेर फिरायला जाताना सुद्धा ते एकत्र जायचे. मिताली लग्नापूर्वी ठाकरे कुटुंबीयांसोबत युरोप टूरलादेखील गेली होती. एखादं सामान्य कपल असावं असं त्यांचं राहाणीमान आहे.

मिताली बोरूडे आणि अमित ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस! राज यांचा राजकीय आवाका मोठा असल्याने कार्यकर्त्यांना या लग्नसोहळ्यासाठी त्यांना आमंत्रित करता आलं नाही. २७ जानेवारी २०१९ ला पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय, जयदेव ठाकरे आणि कुटुंबीय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कुटुंबीय, उद्योगपती रतन टाटा, अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, पंकजा मुंडे आणि त्यांचे पती, रश्‍मी ठाकरे, उज्ज्वला शिंदे, प्रणिती शिंदे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर, पद्मजा फेणाणी, आशा भोसले, बाबासाहेब पुरुंदरे, शायना एन. सी., आमिर खान, उत्तरा केळकर आदी या वेळी उपस्थित होते. अमित आणि मिताली यांचा विवाह सेंट रेजिस हॉटेलमध्ये झाला.




 


Tags:    

Similar News