तृतीयपंथी गौरी सावंतच्या भूमिकेत झळकणार सुश्मिता सेन

Update: 2022-10-08 08:05 GMT


अभिनेत्री सुश्मिता सेन आता ट्रान्सजेंडर च्या भूमिकेत दिसणार आहे .ही एक नवी वेबसिरीज येत आहे.तिच्या सुपरहिट आर्या सिरीज नंतर ती आता या नव्या भूमिकेत दिसेल .

 ही वेबसिरीज गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.त्यांचीच भूमिका सुश्मिता सेन करणार आहे .या सिरीजचे पहिले पोस्टर सुद्धा प्रसिद्ध झाले आहे.जे प्रचंड व्हायरल होत आहे.सुश्मिता सेन हे पोस्टर शेअर करत ,"ताली बजाऊंगी नहीं,बजवाउंगी!"असं कॅप्शन दिल आहे.

त्याचबरोबर गौरी सावंत यांनी सुद्धा एक फोटो शेअर केला आहे ,ज्यामध्ये सुश्मिता सोबत आहे .त्यावर "आम्ही मूळ बायकाच, त्यात माझा रोल तू करणार म्हणजे दुग्धशर्करा योग... हा माझ्या समाजाचा खूप मोठा सन्मान ,तुझ्या धडसाला त्रिवार सलाम "असं कॅप्शन गौरी सावंत यांनी दिले आहे.


Full View

कोण आहेत गौरी सावंत?

तृतीयपंथी गौरी सावंत या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहेत.त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत त्या अमिताभ बच्चन सोबत कौन बनेगा करोडपती मध्ये सुद्धा दिसल्या आहेत.महिला आणि अनाथ मुलांसाठी त्या काम करतात.निराधार लोकांसाठी त्या एन जी ओ सुद्धा चालवतात.

त्यांच्याच आयुष्यावर येणारी ही सिरीज नक्कीच दमदार होऊ शकते .त्यामुळे सिरीजची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे

Tags:    

Similar News