RRR चित्रपटाची जगात का होत आहे चर्चा ? #maxwoman

Update: 2023-01-11 12:41 GMT

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने मंगळवारी अमेरिकेत सुरू असलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कार (80th Golden Globe Awards) सोहळ्यात गौरवास्पद कामगिरी केली आहे. चित्रपटातील नातू नातू (Natu Natu Song) या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. आता ऑस्करच्या शर्यतीत आरआरआरचाही सहभाग असणार आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीतही नामांकन मिळाले आहे. RRR व्यतिरिक्त, चेलो शोला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय श्रेणीमध्ये निवडण्यात आले आहे.

पुरस्कार स्वीकारताना संगीतकार एमएम कीरावानी भावूक...

राजामौली त्यांचे सहकलाकार राम चरण तेज आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह बेव्हरली हिल्स, यूएसए येथे सुरू असलेल्या 80 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते. साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी आरआरआरची ही कामगिरी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. संगीतकार एमएम कीरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राजामौली आणि कलाकारांचे आभार मानताना तो भावूक झाले..

सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपटात पुरस्कार मिळालेला नाही

RRR ला गोल्डन ग्लोब्समध्ये सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपट श्रेणीत देखील नामांकन मिळाले होते. म्हणजे आणखी एक पुरस्कार मिळणे अपेक्षित होते, पण अर्जेंटिना 1985 या चित्रपटाने हा मान मिळवला होता..

भारतीय चित्रपटाला 66 वर्षांपूर्वी पहिले नामांकन मिळाले होते, गांधींनी 5 पुरस्कार जिंकले होते

गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट 1957 मध्ये होता. व्ही शांताराम यांच्या चित्रपटात व्ही शांताराम स्वतः मुख्य भूमिकेत होते आणि अभिनेत्री संध्याने त्यांच्यासोबत एक संस्मरणीय भूमिका साकारली होती. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत पुरस्कार मिळाला होता. यानंतर 1983 मध्ये रिचर्ड अॅटेनबर्ग यांच्या गांधी चित्रपटासाठी नामांकन मिळाले. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्र, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (बेन किंग्सले) असे 5 गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले होते.

2009 मध्ये, संगीत दिग्दर्शक एआर रहमान यांना स्लमडॉग मिलेनियरसाठी सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले पुरस्कारही मिळाले आहेत. याशिवाय 1989 मधील सलाम बॉम्बे आणि 2002 मधील मान्सून वेडिंग या चित्रपटांनाही गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळाले आहे.

Tags:    

Similar News