मुग्धा वैशंपायनला सुवर्ण पदक! पती प्रथमेश लघाटे म्हणतो, "तुझा अभिमान वाटतो!"
मुग्धा वैशंपायनला सुवर्ण पदक! पती प्रथमेश लघाटे म्हणतो, "तुझा अभिमान वाटतो!"
'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायनला नुकतेच मुंबई विद्यापीठाकडून सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे. तिच्या या यशाबद्दल पती प्रथमेश लघाटेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केले आहे. मुग्धाला मुंबई विद्यापीठाकडून सुवर्ण पदक मिळाले असून पती प्रथमेश खुप आनंदी झाला आहे. मुग्धासाठी सोशल मीडिया वर प्रथमेशने एक खास पोस्ट शेअर करून प्रथमेशने मुग्धाचा सुवर्ण पदक आणि सर्टिफिकेट स्वीकारतानाचा फोटो शेअर करत लिहिले आहे, "बायको तुझे खूप खूप अभिनंदन, आम्हाला तुझा अभिमान वाटतो." यासोबतच त्याने हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत.
मुग्धाची ही उत्कृष्ट कामगिरी असल्याच म्हटल जात आहे. मुग्धा वैशंपायनने भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवून भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. 2021 ते 2023 या कालावधीत तिने हा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमात तिने सर्वाधिक गुण मिळवले आणि ती दिवंगत श्री रंजनकुमार एच. वैद्य सुवर्ण पदकाची मानकरी सुद्धा ठरली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये मुग्धा वैशंपायनला सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. या आनंदी क्षणी मुग्धाचे आई-वडिल उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला त्यांनी देखील उपस्थिती लावली.
मुग्धा आणि प्रथमेश:
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे दोघेही मराठी कलाकार आहेत. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. 2022 मध्ये त्यांनी लग्न केले आणि तेव्हापासून ते एकत्रितपणे आनंदी जीवन जगताना दिसतात.
पत्नीच्या यशाबद्दल प्रथमेश व्यक्त केलेला अभिमान अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कलाकार असूनही शिक्षणाला प्राधान्य देणारी मुग्धा आणि तिच्या यशाबद्दलचा प्रथमेशचा अभिमान हे निश्चितच स्तुत्य आहे.