Gadar 2: सनी देओलचा चित्रपट "नॉट आऊट" ₹ 300 कोटी, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ.
सनी पाजीच्या (Sunny deol) गदर २ ने एव्हाना देशभरातील बहुसंख्य चाहत्यांना वेडं केलं आहे. सध्याचे वातावरण तर गदर २ ने प्रभावित झाले आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी सनीच्या गदर २ चे नाव आहे. त्याचे कारण गदर २ चे झालेलं प्रमोशन आणि त्याची लोकप्रियता. चित्रपटाने शुक्रवारी ₹ 300 कोटींचा टप्पा ओलांडला, गेल्या गुरुवारी आणि शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. यात चित्रपमध्ये रजनीकांतचा 'जेलर', देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्या 'ओएमजी २' या चित्रपटांचा समावेश आहे. गदर 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे .
'OMG 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन (OMG 2)
अक्षय कुमारच्या ओ माय गॉड 2 (OMG 2) चित्रपटाने अर्ली ट्रेंड्सनुसार शुक्रवारी भारतात ₹5.6 कोटींचा व्यवसाय केला. OMG 2 ने आत्तापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे ₹90.65 कोटी कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 85.05 कोटींची कमाई केली आहे.
रॉकी और रानी की प्रेम कहानी बॉक्स ऑफिस कलेक्शन ( Rocky Aur Rani Ki Prem कहाणी)
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या यशानंतर करण जोहरचा आनंद गगनात मावत नाहीय. शुक्रवारी, त्याने जाहीर केलेकी या चित्रपटाने रिलीजच्या तीन आठवड्यांत जागतिक बॉक्स ऑफिसवर ₹300 कोटींची कमाई केली आहे. करणने इंस्टाग्राम पोस्ट करत ही मोठी बातमी शेअर केली आणि त्याच्या चाहत्यांचे आभार मानले.