"College Days!जुन्या आठवणींना उजाळा अभिनेता अंकुश चौधरीने केला पोस्ट व्हिडिओ

अंकुश चौधरी आणि दीपा परब यांची लव्ह स्टोरी सर्वांना माहितीच असेल यांनी नुकतेच सोशल मीडियावर एका व्हिडीओ माध्यमातून त्यांच्या पहिल्या भेटीची आणि प्रेमकथेची कहाणी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.;

Update: 2024-02-08 12:41 GMT

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अकुंश चौधरी (Ankush Chaudhari) हा सर्वांचा लाडका आहे. अंकुश चौधरीचा मोठा चाहतावर्ग आहे. आजही त्याच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आजही तरुणाईंच्या हृदयावर अंकुश चौधरी राज्य करतोय.


अंकुश चौधरी आणि दीपा परब यांची लव्ह स्टोरी सर्वांना माहितीच असेल यांनी नुकतेच सोशल मीडियावर एका व्हिडीओ माध्यमातून त्यांच्या पहिल्या भेटीची आणि प्रेमकथेची कहाणी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या दोन्ही कलाकारांच शिक्षण मुंबईतील परेलच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये झाल आहे. याच कॉलेजमध्ये एका कट्ट्यावर त्यांची पहिली भेट झाली.




 

तो त्याच्या मित्रांसोबत कॉलेजच्या कट्ट्यावर बसला होता, तेव्हा दीपा तिथे तिच्या मित्रांसोबत आली. तेव्हापासून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली असं अंकुशने व्हिडीओमध्ये सांगितले आहे. अंकुश आणि दीपा यांच्यात हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कॉलेजमध्ये एकत्र वेळ घालवताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.लग्नापूर्वी अंकुश आणि दीपा यांनी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल आहे. 2008 मध्ये या दोघांच्या लग्नाची लग्नगांठ बांधली गेली. आज ते दोघेही एक सुखी वैवाहिक जीवन जगतात आणि त्यांना एक मुलगाही आहे.

अंकुश आणि दीपा यांच्या व्हिडीओला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रेमकथेचे कौतुक केले आहे. अंकुश आणि दीपा यांनी व्हिडीओला "College Days!जुन्या आठवणींना उजाळा..!" असे कॅप्शन दिले आहे. अंकुश आणि दीपा यांच्या पहिल्या भेटीची आणि प्रेमकथेची कहाणी प्रेरणादायी आहे. त्यांची कहाणी अनेकांना प्रेरणा देईल यात शंका नाही.

Tags:    

Similar News