Karwa Chuath 2024 : बॉलिवूड अभिनेत्रींनी साजरा केला करवा चौथ

Update: 2024-10-21 06:21 GMT

करवा चौथ हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. जो विशेषतः विवाहित महिलांसाठी अत्यंत विशेष मानला जातो. या दिवशी विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपासना करतात. करवा चौथ हा उत्सव मुख्यतः उत्तर भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, पण महाराष्ट्रातही याला महत्त्व आहे. या सणामुळे विवाह नातेसंबंधात प्रेम आणि बंधनांची मजबुती येते. करवा चौथ म्हणजे एकत्रितपणा, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या दिवशी दिवसभर पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळी उपवास करते. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीची पूजा करून पत्नी आपला निर्जळी उपवास सोडते.

बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील आपल्या जोडीदाराच्या सुखासाठी हा सण साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने करवा चौथ साजरा केला. कतरिनाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदाने देखील करवा चौथ साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने देखील करवा चौथ साजरा केला.

करवा चौथचे महत्व :

पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना : या दिवशी महिलांनी उपासना करून पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात

सामाजिक एकता : या सणाच्या निमित्ताने महिलांमध्ये एकत्र येण्याची, गप्पा मारण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची संधी मिळते

संस्कार आणि परंपरा : हा सण पारंपरिक मूल्यांना जपण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे

सजावट आणि उत्सव : महिलांना या दिवशी विशेष सजावट, रंगीबेरंगी कपडे, आणि रांगोळी तयार करण्याची आनंददायी संधी मिळते.

उपासना आणि विधी : करवा चौथच्या दिवशी महिलांनी उपासना करण्यासाठी उपास करणे, चंद्राचे दर्शन घेणे आणि विशेष प्रसाद तयार करणे यांचा समावेश असतो. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर महिलांनी पतीस पानी आणि मिठाई देऊन उपासना संपवली जाते.

Tags:    

Similar News