लेकीसाठी तिचा बाबा हा कायमच बापमाणूस असतो... “बापमाणूस” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस..

लेकीसाठी तिचा बाबा हा कायमच बापमाणूस असतो... अशी हृदयस्पर्शी चित्रपटाची टॅगलाइन घेऊन ‘बाप माणूस’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.;

Update: 2023-02-21 13:55 GMT

लेकीसाठी तिचा बाबा हा कायमच बापमाणूस असतो... अशी हृदयस्पर्शी चित्रपटाची टॅगलाइन घेऊन ‘बाप माणूस’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग (Pushkar Jog) यांच्या निर्मिती संस्था, आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी एकत्रित निर्मिती केली आहे. यांचा 'बाप माणूस' हा चौथ्या चित्रपट असून दसरा या सणाचे औचित्य साधून सोशल मीडियावर चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग, अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके, शुभांगी गोखले आणि बाल कलाकार कीया इंगळे दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश फुलपगार यांनी केले आहे. आणि हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. त्याच बरोबर पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर यांची सुद्धा एक मेकांसोबत एकत्र काम करण्याची पहिलीच वेळ आहे. आणि अनुषा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम करणार आहे.

बाबा आणि मुलीच्या अनोख्या नात्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच “बापमाणूस” या चित्रपटाचा ट्रेलर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रिलीस करण्यात आला होता. बापमाणूस हा चित्रपट फादर्स डे म्हणजेच १६ जुन २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शूटिंग लंडन मध्ये झाली आहे.

ही कहाणी वडील आणि मुलीच्या यांच्या अतूट नात्याची आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीस झाला असून या चित्रपटाला कोंमेंट्स आणि लाइकस च्या माध्यमातून प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.

https://youtu.be/O5YGJpWIYmI

पुष्करचा 'व्हिक्टोरिया' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह आणि राहुल व्ही दुबेहे सह निर्माता आहेत.



Tags:    

Similar News