अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: स्वप्नांची राणी राधिका धैर्याची कहाणी
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो. ही म्हण अनेकदा खरी ठरली आहे. याची उदाहरण देखील अनेक आहेत. त्यापैकीच एक उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. ते म्हणजे अनंत अंबानी यांच्या स्वप्न आणि धैर्यात राधिका मर्चंट यांचा मिळालेला आधार आणि साथ, अनंत अंबानी यांनी व्यक्त केल्या भवना;
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो. ही म्हण अनेकदा खरी ठरली आहे. याची उदाहरण देखील अनेक आहेत. त्यापैकीच एक उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. ते म्हणजे अनंत अंबानी यांच्या स्वप्न आणि धैर्यात राधिका मर्चंट यांचा मिळालेला आधार आणि साथ, अनंत अंबानी यांनी व्यक्त केल्या भवना
जगातील टॉप 10 उद्योगपती पैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नपूर्व सोहळ्याला धुमधडक्यात सुरुवात होत आहे. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, फेसबूकचे मार्क झकरबर्ग ते डिस्नेचे सीईओ बॉब इगर असे अनेक दिग्गज उद्योगपती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 1 ते 3 मार्च असा हा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे. या पार्श्वभूमीवर अनंत अंबानी यांनी आज तक ला देलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनंत अंबानी म्हणतात "राधिकाला मिळवून मी भाग्यशाली बनलो आहे. ती माझ्या स्वप्नांची राणी आहे. लहानपणी मी कधीच लग्न करणार नाही असा विचार करत होतो. कारण मला प्राण्यांसाठी खूप प्रेम होते आणि मी त्यांच्या देखभालीसाठी समर्पित झालो होतो. परंतु राधिकाला भेटल्यानंतर मला ती माझ्यासारखीच असल्याचे जाणवले. तिलाही प्राण्यांबद्दल प्रेम आणि प्राणी पाळण्याची आवड आहे," असे अनंत अंबानी म्हणाले.
अनंत अंबानी यांना काही हेल्थ इश्यू आहेत हे निता अंबानी यांनी पूर्वीच सांगितले होते. त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी राधिकाने खूप साथ दिल्याचे अनंत यांनी म्हटले. "मला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. माझ्या कठीण काळात राधिका नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहे," असे अनंत म्हणाले.
"राधिकाने मला नेहमी बळ दिले. तिच्या आई-वडिलांनीही मला कधी आजारी असल्याची जाणीव करून दिली नाही. माझ्या कुटुंबमुळे आणि राधिकाच्या येण्याने मला धैर्य मिळाले. हिम्मत हारू नको, नेहमी लढत रहा अशी कित्येक लोक आहेत, ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त त्रास होतो," असे राधिका म्हणाली होती, असे अनंत अंबानी यांनी मुलाखतीत सांगितले.
अनंत आणि राधिका यांच्या प्रेमकथेची सुरुवात बालपणीच्या मैत्रीपासून झाली. दोघेही एकाच शाळेत शिकले आणि नंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली. 2023 मध्ये अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला आणि आता ते लग्नबंधनात अडकण्यास तयार आहेत.
अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची देशभरात उत्सुकता आहे. हा विवाहसोहळा निश्चितच भव्य आणि अविस्मरणीय होणार यात शंका नाही.