आलिया भट्टचा मेट गालातील 'तो' फोटो व्हायरल

आलिया भट्टने कानामागे काजळाचा तीट लावले आणि ती असं म्हणते "बुरी नजरवाले..";

Update: 2024-05-09 12:45 GMT

बॉलीवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टने न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या मेट गालाला हजेरी लावली होती, त्यामध्ये रेड कार्पेटवरील तिच्या स्टनिंग लुकची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. तर प्रसिद्ध फॅशन डिसायनरसब्यसाची मुखर्जी यांनी डिसाइम केलेली फ्लोरल साडी आलिया भट हिने मेट गाला २०२४ मध्ये परिधान केली होती. मेट गालातील तिचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

तर आलिया देखील या डिसायनर साडीमध्ये खुप सुंदर दिसत होती. या खास दिवशी अभिनेत्रीने तिच्या कानामागे काजळाचा काळा टिळा लावला होता. आणि आलियाच्या चाहत्यांना तिच्या फोटोमध्ये हा टिळा दिसला असून आता हा विषय अधिक चर्चेचा विषय ठरला आहे . तर आलियाने लावलेल्या या काजळाच्या काळ्या टिळ्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असुन, आलियाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


एकाने तिला कमेंटमध्ये असे म्हटले आहे की “तिने काळा टिळा लावलाच पाहिजे, कारण ती या साडीमध्ये खूप सुंदर दिसतेय.” अश्या एक नव्हे तर अनेक कमेंन्सचा वर्षांवर आलियाच्या चाहत्यांनी आलियावर केला.

आलियाच्या कामाबद्दल सांगायचे झालं तर आलिया ‘जिगरा’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ‘द आर्चिज’फेम वेदांग रैना आलियाबरोबर प्रमुख भूमिकेत दिसेल. याशिवाय आलियाचा ‘लव्ह ॲण्ड वॉर’ चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Tags:    

Similar News