रणवीरच्या व्हायरल फोटोबद्दल आलीया भट्टने दिली धक्कादायक प्रतिक्रिया

अनेक कलाकार रणवीर ला समर्थन देत आहेत. दरम्यान बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्टने देखील रणवीरच्या या न्युड फोटोशुट वर आपली प्रतिक्रीया दिली आहे.;

Update: 2022-07-27 11:44 GMT



बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग सध्या जोरदार चर्चेत आहे, तो त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे. काहींनी रणवीर कौतुक केलं आहे तर काहींनी त्याच्यावर कडाडून टीका केली आहे. तर अनेक कलाकार रणवीर ला समर्थन देत आहेत. दरम्यान बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्टने देखील रणवीरच्या या न्युड फोटोशुट वर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

खरंतर आलिया भट्ट ही नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय असते. तीने तिच्या 'डार्लिंग्स' या वेब चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान तिला रणवीर सिंगच्या लेटेस्ट फोटोशूटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. आलियाला विचारण्यात आलं की, रणवीर सिंग या शूटबद्दल सतत नकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहेत. तुम्ही याबद्दल काय बोलालं तुमचे यावर काय मत आहे ? यावर आलिया भट्ट म्हणाली, "माझ्या आवडत्या रणवीर सिंगबद्दल मला काहीही नकारात्मक ऐकू येत नाही."

आपला मुद्दा पुढे ठेवत अभिनेत्री म्हणाली, 'मी हा प्रश्न ऐकूही शकत नाही. रणवीरने आपल्याला खूप काही दिले आहे आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला फक्त प्रेम देऊ शकतो." अशी रणवीरच समर्थन करणारी प्रतिक्रीया आलिया ने दिली.

रणवीर ने एका मॅग्झीनसाठी फोटोशुट केले आहे. हे मॅग्झीन इंटरनॅशनल दर्जाच असल्याले रणवीर चे फोटोशुट वापरल आहे. त्याच्या या धाडसाच सर्वत्र बॉलिवूड कलाकारांकडू कौतुकही झाल आहे.. जिथे अनेक कलाकार रणवीर सिंगला सपोर्ट करत आहेत.

Tags:    

Similar News