आई सोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्री शिखा मल्होत्राची भावनिक पोस्ट
शिखा मल्होत्राने 'कांचली' चित्रपटात लिडरोल केला आहे.;
अभिनेत्री शिखा मल्होत्राने कोरोनाला हरवल्यानंतर तिला अर्धांगवायू आणि ब्रेन स्ट्रोक झाला. शिखा आता या आजारातूनबही बरी होत आहे. पण स्वत:च्या पायावर उभं राहता येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या संदर्भातील माहिती स्वत: शिखाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे.
शिखानं आता आईसोबतचा एक फोटो शेअर करत ' हळूहळू का होईना पण माझ्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.मला शंका आहे की मी आधी सारखं चालू शकणार की नाही.' असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच तिनं एका मुलाखतीत सांगितलं की, स्ट्रोक आल्यानंतर आधी तिला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र प्रकृतीत सुधारणा नसल्यानं तिला केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं.
शिखा एक सर्टिफाइड नर्स आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच तिने रुग्णसेवेचाही वसा घेतला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील हिंदू हृदयसम्राट ट्रॉमा सेंटरमध्ये ती नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा करत होती. सहा महिने तिने ही सेवा केली. त्यावेळीच तिला कोरोनाची लागण झाली होती.