संतापजनक : क्वारंटाइन सेंटरमध्येच महिलेवर बलात्कार
X
पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र, या घटनेमुळं पनवेलमध्ये एकच खळबळ माजली आहे. महिलांच्या क्वारंटाइन कक्षात पुरुष रुग्ण पोहोचालाच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयीत म्हणून दाखल झालेल्या विकृत तरुणाने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत कलम 376,354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा कॉरंटाइन कालावधी संपल्यानंतर पनवेल तालुका पोलीस पुढील कारवाई करतील. असे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.