Home > व्हिडीओ > आरोग्य मंत्र्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून महिला पोलिसाला द्यावा लागला राजीनामा

आरोग्य मंत्र्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून महिला पोलिसाला द्यावा लागला राजीनामा

आरोग्य मंत्र्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून महिला पोलिसाला द्यावा लागला राजीनामा
X

कायदा सर्वांना समान असतो. मात्र, कायदा हा फक्त कागदावर लिहिण्यापुरताच समान असतो का? गुजरातमध्ये लॉकडाऊन च्या काळात संचारबंदी सुरु असताना आरोग्यमंत्र्यांचा मुलगा प्रकाश आपल्या वडिलांची गाडी घेऊन त्याच्या मित्रासोबत बाहेर मास्क न लावता फिरत होता. म्हणून त्याला कर्तव्यदक्ष महिला कॉन्स्टेबल सुनिता यादव यांनी हटकलं. आणि त्याला जाब विचारला तर या महिला कॉन्स्टेबलला राजीनामा द्यावा लागल्याचं वृत्त आहे.

या संदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान लॉकडाऊन असतानाही विना मास्क न वापरता फिरणाऱ्या प्रकाश ला सुनिता यादव यांनी मास्क बाबत विचारले असता प्रकाशने सुनिता यांना वर्षभर याच ठिकाणी ड्युटी लावेल, अशी धमकी दिली होती.

Updated : 13 July 2020 6:40 AM IST
Next Story
Share it
Top