"तुला काय अक्कल हाइ का?" कोवीड सेंटरमध्ये दारु पीणाऱ्यांना महापौरांनी झापलं
जळगाव कोवीड सेंटरमध्ये दारुच्या बाटल्या आणि गुटखा आढळल्याने महापौर भारती सोनवणे यांनी दारु पिणाऱ्यांना झापलं, दारुडा विमलच्या पुड्या घेवून पळाला
Max Woman | 11 March 2021 12:30 PM IST
X
X
जळगाव महानगर पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये महापौर भारती सोनवणे या पाहणी करण्यासाठी गेल्या असता, त्यांना एक कोरोना रुग्ण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. कोरोना रुग्ण बाहेर जाऊन दारू घेऊन आला असल्याचा प्रकार समोर आल्याने महापौरांनी त्याला चांगलेच खडसावले.
महापौरांनी मद्यपीकडून ४ दारूच्या बाटल्या आणि गुटख्याच्या पुड्या जप्त केल्या. मुजोर मद्यपीला जाब विचारत असतांना गुटख्याच्या पुड्या घेऊन त्याने खोलीत पळ काढला. संबंधित मद्यपी रुग्णाने खोलीला आतून कडी लावून आत्महत्येची धमकी दिली. महापौर भारती सोनवणे यांनी त्या रुग्णावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Updated : 11 March 2021 12:30 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire