Home > व्हिडीओ > ‘धुळ्यातील ते वाईन शॉप बंद करा, नाहीतर आमरण उपोषण करु’ महिला आक्रमक

‘धुळ्यातील ते वाईन शॉप बंद करा, नाहीतर आमरण उपोषण करु’ महिला आक्रमक

‘धुळ्यातील ते वाईन शॉप बंद करा, नाहीतर आमरण उपोषण करु’ महिला आक्रमक
X

दारु बंदीच्या विषयावर महिला नेहमीच आक्रमक असतात. आता धुळे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले एक वाईन शॉप बंद करण्याच्या मागणीसाठी मल्हार महासंघ महिला आघाडीच्या महिला आक्रामक झाल्या आहेत. या वाईन शॉप जवळच सर्व सरकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, शाळा, महाविद्यलय व बस स्थानक असल्याने याचे समाजावर दुष्परिणाम होतील असं या महिलांचं म्हणणं आहे.

धुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विनोद वाईन शॉपमुळे शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वाईन शॉप पासून शहर पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा कारागृह व शवविच्छेदन गृह, जिल्हा रुग्णालय जवळ आहेत. दारू पिणारे भर रस्त्यावर धिंगाणा घालत असतात. त्यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्या महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळं लवकरात लवकर हे वाईन शॉप बंद करण्यात यावे, अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा या महिलांनी दिला आहे.

https://youtu.be/ssZzC9erDOY

Updated : 30 July 2020 4:33 AM IST
Next Story
Share it
Top