“...कारण आपण युवा पीढी आहोत” वाढदिवसा निमीत्त रोहित पवार यांचं तरुणांना भावनिक आवाहन
X
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने रोहित पवार यांनी कर्यकर्त्यांकडे एक गिफ्ट मागीतलं आहे. वाढदिवसानिमित्त नवा संकल्प करत त्याबाबतचा व्हिडिओ रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे.
"माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझे मित्र, भाऊ-भगिनी व कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करायला सुरुवात केलीय. आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल. पण वाढदिवसानिमित्त मला आपल्या सर्वांकडून एक गिफ्ट हवंय. मी ते तुम्हाला हक्काने मागतोय आणि आपण ते मला नक्की द्याल असा मला विश्वास आहे." असं आव्हन फेसबुकच्या माध्यातून रोहित पवार यांनी केला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. स्मार्टफोनसारखी साधने घेऊन देण्याबाबत, दहावी, बारावी झालेल्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत विचार करावा. नैराश्याने ग्रासलेल्या तरुणांना धीर देण्याचा विचार करा. आता हे आवाहन मी इतरांना करतोय असं नाही. मी स्वत: शारदानगर संकुलातील १०० मुलींच्या शिक्षणाचा यंदाचा खर्च उचलण्याचा संकल्प माझ्या वाढदिवसानिमित्त केला आहे. असं देखील रोहित पवार म्हणाले.