Home > व्हिडीओ > औरंगाबादमध्ये डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

औरंगाबादमध्ये डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

९८ लाख ४९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त, IPS मोक्षदा पाटील यांची माहिती

औरंगाबादमध्ये डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
X

देशभरातल्या विविध राज्यात पेट्रोल पंपावरून डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीचा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या टोळीतील तब्बल १४ जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेतील टोळीने ५६ पेक्षा अधिक गुन्हे केले आहेत. तसेच यांच्याकडून ९८ लाख ४९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली आहे.

१६ फेब्रुवारी रोजी रात्री धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री पेट्रोल पंपावरून जवळपास ४ लाखाच्या डिझेलची चोरी केली होती.याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात १७ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता. त्यांनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनी सापळा रचून टोळीला ताब्यात घेतले असून,आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ३ मोठे ट्रक, डिझेल चोरी करण्यासाठी वापरलेले हॅण्डपंप , डिझेलने भरलेले ४५ कॅन आणि ८ मोबाईलचा समावेश आहे.

पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी यावर माहिती देताना,या टोळीचा प्रमुख राम्या पाना पवार हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा येथील रहिवासी असल्याचं म्हंटलं आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक मालक हे या टोळीकडून कमी दरात डिझेल विकत घेत होते. टोळीप्रमुख असलेल्या राम्या पवारवर घरफोडी, दरोडा, लुटमार आणि मारहाणीचे २७ गुन्हे नोंद असल्याची माहिती सुद्धा पाटील यांनी यावेळी दिली.

Updated : 19 Feb 2021 8:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top