Home > व्हिडीओ > हुरडा पार्टी जोरात, तुम्ही पण चला शेतात!

हुरडा पार्टी जोरात, तुम्ही पण चला शेतात!

हुरडा पार्टी जोरात, तुम्ही पण चला शेतात!
X

मित्रांनो थंडीचा मोसम सुरू झालाय आणि या कडाक्याच्या थंडीत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय हुरडा पार्टीची धम्माल. हिवाळ्यात थंडीचा जोर वाढला की लोकांना वेध लागतात ते हुरडा पार्टीचे. शेतात बसून शेकोटीची ऊब घेत जोडीला गवऱ्यांच्या आगीवर भाजली जाणारी गोड ज्वारीची कंस, गरमागरम हुरडा आणि त्यासोबत चवीला लसूण, शेंगदाणे, तीळाची चटणी आणि दही म्हणजे तोंडात पाणी आल्याशिवाय राहाणार नाही. निसर्गाच्या सानिध्यात कुटुंब आणि मित्रांसोबत गप्पांच्या मैफलीत या हुरडा पार्टीची गोष्ट काही वेगळीच असते.

औरंगाबाद-पैठण रोडवरच्या देवगिरी हुरडा सेंटर हिच हुरडा पार्टीची धम्माल सध्या सुरू आहे. डिसेंबर महिना आला की देवगिरीव हुरडा सेंटरमध्ये शहरातील लोकांची हुरडा पार्टी करण्यासाठी झुंबड उडते. शहरातील लोक खास सुट्टी काढून हुरडा पार्टीचा प्लॅन करतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन थोडासा कुटुंबासोबत निवांत वेळ घालवून हुरडा पार्टीचा आनंद लुटण्यासाठी लोक देवगिरी हुरडा सेंटरमध्ये येत असतात. गुलाबी थंडीत गरमागरम हुरडा खाण्याची मजाच काही वेगळी असते. वाढत्या शहरीकरणामुळं आणि नवं-नवीन तंत्रज्ञान यांमुळे गावाकडच्या अनेक गोष्टी लुप्त होत चालल्या आहेत. मात्र राज्यातील विविध हुरडा केंद्रावर याच जुन्या गोष्टी नवीन पिढीला पाहायला मिळत आहेत.

हुरडा पार्ट्यांच्या माध्यमातून शेती व्यवसायाबरोबरच आर्थिक बाजू वाढविण्यासाठी आणि या व्यवसायातून इतरांनाही रोजगार मिळवून दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनाही या हुरडा पार्ट्या होत असल्यामुळं समाधान वाटतंय. सध्याच्या पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मंडळींना हुरडा पार्टीतल्या या चविष्ट रानमेव्याचा स्वाद आवर्जून चाखता यावा म्हणून ग्रामीण भागात आता अनेक हुरडा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

हुरडा पार्टी जोरात, तुम्ही पण चला शेतात! तुम्हालाही या थंडीत हुरडा पार्टी करायची असेल तर तुमच्या मित्र मंडळींना घ्या सोबत अन् गाठा तुमच्या गावचं देवगिरी हुरडा केंद्रासारखं एखादं केंद्र...तसंही इस थंड मे पार्टी तो बनती है!


Updated : 27 Jan 2021 8:23 PM IST
Next Story
Share it
Top