Home > News > ‘सत्तेत आल्यावर सर्व स्वस्त होइल’ म्हणणाऱ्यां केंद्र सरकारचं वागणं विपरीत – यशोमती ठाकूर

‘सत्तेत आल्यावर सर्व स्वस्त होइल’ म्हणणाऱ्यां केंद्र सरकारचं वागणं विपरीत – यशोमती ठाकूर

‘सत्तेत आल्यावर सर्व स्वस्त होइल’ म्हणणाऱ्यां केंद्र सरकारचं वागणं विपरीत – यशोमती ठाकूर
X

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मोदी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन केले. त्याचाच भाग म्हणून अमरावती इथं कॉग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोनल करण्यात आलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, आता जे केंद्रात आहेत तेच सत्तेत येण्या अगोदर सांगत होते, ‘आम्ही सत्तेत आलो तर सर्व काही स्वस्त होणार’ पण, आता केंद्र सरकारचं त्याच्या विपरीत वागणं दिसतंय. केंद्रात बसलेला प्रत्येक माणूस सत्तेत येण्याआधी ‘आम्ही सर्व स्वस्त देऊ’ सांगत होता. त्यांची घोषणा होती ‘अब की बार मोदी सरकार, पेट्रोल डिझेल के भाव पर हम करेंगे मार’ अशा घोषणा देत होते. याच्या उलटच सर्व सुरु आहे. त्यामुळेच आमचं आज आंदोलन सुरु आहे.” असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Updated : 29 Jun 2020 2:19 PM IST
Next Story
Share it
Top