‘गलवान आणि पॅंगॉंग खोरे भारतात नाही का?’ प्रणिती शिंदेंचा पंतप्रधानांना सवाल
Max Woman | 1 July 2020 2:44 PM IST
X
X
“खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला, त्यात 20 जवानांचा बळी गेला. सशस्त्र चिनी सैनिकांबरोबर लढताना आपले सैनिक नि:शस्त्र का होते? भारत सरकारने त्यांना शस्त्र पुरविले नाहीत का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केली नाही, असे खोटे वक्तव्य करून चीनला क्ली न चिट दिली. गलवान आणि पॅंगॉंग खोरे भारतात नाही का? हा भारतात आहेच म्हणून चिनी सैनिकांनी घुसखोरी केली. पंतप्रधान मोदी स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी खोटे बोलत आहेत. त्यांच्या खोटे बोलण्याचा वापर चीन आणि जागतिक माध्यमांनी बेकायदेशीर कब्जाचे समर्थन करण्यासाठी केला आहे. म्हणून पंतप्रधान मोदींनी जनतेसमोर येऊन खरी बाजू मांडली पाहिजे आणि भारतीय जवानांची व जनतेची माफी मागितली पाहिजे” अशी मागणी कॉंग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
Updated : 1 July 2020 2:44 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire