राज ठाकरे की तृप्ती देसाई कोणाची मागणी पूर्ण करणार ठाकरे सरकार?
X
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोरोनाच्या संकटात राज्याचं अर्थचक्र पुर्वपदावर येण्यासाठी दारुची दुकानं सुरु करण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना केली. या मागणीला भुमाता ब्रीगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी विरोध दर्शवताना महिलांचा शाप मिळालेला महसूल सरकारने स्वीकारु नये अशी विनंती केली आहे.
हे ही वाचा...
- लॉकडाउन मध्ये तृप्ती देसाईंना दारु खरेदी करताना अटक?
- संताच्या भुमीतच साधूंची हत्या, गृहमंत्री करतायत काय?- तृप्ती देसाई
- कायद्यात मंत्री, श्रीमंत आणि मर्जीतल्यांसाठी वेगळा न्याय का?- तृप्ती देसाई
राज ठाकरे यांच्या मागणीनुसार दारु विक्रीतून महसुल मिळेल पण, महिलांचे शाप मिळणारा महसूल राज्य सरकारने वापरु नये असं मत त्यांनी मांडलं.
“एक महिना उलटून गेला महाराष्ट्रात दारूची दुकाने बंद आहेत. राज्यातील जनता व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे परंतु अचानक वाईन शॉप सुरू केले तर घरी जे काही साठवलेले, उरलेले पैसे आहेत ते दारूवर खर्च केले जातील. गुन्हेगारी वाढेल आणि गरीब घरातील माणसं धान्य विकून दारू घ्यायला जातील. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते.” अशी भीती तृप्ती देसाईंनी व्यक्त केली.
राज्याचा महसूल वाढला पाहिजे हे बरोबर आहे परंतु तो दारूतून नको. अनेक महिलांचा संसार उध्वस्त या दारुमुळेच झाला आहे. सरकारने दारूची दुकाने सुरू करू नये एवढीच सर्वसामान्यांच्या वतीने तृप्ती देसाई यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली.
https://youtu.be/BbDw2Z_rYas