आपल्या देशात चिल्ड्रन टॉयलेट का नसतात?
Max Woman | 30 Dec 2019 12:05 PM IST
X
X
लेकाला घेऊन एकटीने प्रवास करताना कोणत्या अडचणी येतील. या शक्यता व त्यावरच्या पर्यायाचा बेसिक होमवर्क माझ्या मनात होता. पण एके ठिकाणी हे ऑप्शन मँनेजमेंट चाललं नाही. सार्वजनिक शौचालयांच्या उपलब्धतेचा मुद्दा तर कायम असतोच. पण यावेळी मुलाचं सगळं म्हणणं ऐकुन घेतल्यावर, अनुभवल्यानंतर यापद्धतीने विचार करायला हवा होता. हे लक्षात आलं.
नऊ वर्षाच्या आत्मजने मी लेडीज टॉयलेटमध्ये जाणार नाही. तू बाहेर उभी राहा. असा स्टँन्ड घेतला. एकदा वेळ रात्री साडेबाराची होती. हायवे नजिकची टॉयलेट्स, त्यांची अवस्था..right to pee शी जोडले असल्याने माझ्या डोक्यात स्ट्क्चर, सेफ्टी, टॉयलेट सीटस् असे शेकडो प्रश्न नाचू लागले. जवळपास मॉल, रुग्णालयही नव्हतं. अरे, तू लहान आहेस, इटस् ओके, तू माझ्यासॊबत चल... कुणी काही चिडवत नाही.
नो.तो ठाम. मी म्हणतोय का तू तिथं ये,इतकी काय टेन्स होते?
मला जेन्टस्मध्ये जाता येईना.
हो ना करता करता...
कडी, पाणी, लाईट पटकन बाहेर ये
काही वावगं वाटलं तर मोठ्याने आवाज दे. आतल्या इतर कुणाला एन्टरटेन करु नको, माहिती देऊ नको... दोनशे सूचना देत मी बाहेर उभी राहिले.. दोन मिनिटं ,चार मिनिटं... माझा पेशन्स सुटू लागला. आतमध्ये डोकावले तर दोघातिघांनी तिसरटपणे, एक दोघांनी भुवया उडवुन हसुन पाहिले. आत जाणाऱ्या एका पंधरा सॊळा वर्षाच्या मुलाला न राहवुन सांगितलं. आतमध्ये आत्मज नावाचा मुलगा आहे, त्याला आवाज दे, आई बाहेर वाट पाहत्येय सांग..
त्याने हाक दिली मोठ्याने पण पठ्ठ्यांचा ओ नाही. तीन, दोन, एक..जायचं आतमध्ये? मी करो या मरो सिच्युएशनमध्ये, फारफार तर काय .. तेवढ्यात महाशय बाहेर आले.ओ नाय देता येत का तुला, मोठा जेन्टस्मध्ये जातोय... माझा आवाज चढला तसा तोही वैतागला..
तुच सांगितलं होतं ना? कुणा अननोनला ओ देऊ नकोस...
जेन्टस् काय चिडवतेस, i dont feel comfortable aai आमच्यासाठी चिल्ड्रन टॉयलेट नसतं का? प्रवास करताना टॉयलेटच्या बाहेर मुलांना ठेवता येत नाही. आत घेऊन जाता येत नाही. ही अडचण शेकडो महिलांनी सांगितली. जाण येत असताना मुलांना एक कूप स्वत: च हवं असं वाटलं. तर खरंच त्यात चूक काय? या शहरात स्त्रियांना स्वच्छ, सुरक्षित मोफत सार्वजनिक शौचालये मिळावी म्हणून डोकंफोड करावी लागते, व्होटबँक नसलेल्या या मुलांच्या छोट्या मागणीकडे कोण पाहणार?
Updated : 30 Dec 2019 12:05 PM IST
Tags: children's toilets women
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire