Home > Uncategorized > वैशाली येडे यांच्या प्रचाराची भन्नाट आयडिया

वैशाली येडे यांच्या प्रचाराची भन्नाट आयडिया

वैशाली येडे यांच्या प्रचाराची भन्नाट आयडिया
X

देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप करत वैशाली येडे यांनी प्रचाराची सुरवात केली आहे. या भन्नाट आयडियाची चर्चा सुरु झाली आहे.

प्रहार संघटनेच्यावतीने शुक्रवारी यवतमाळमधील बस स्थानक चौकातील एका देशी दारू दुकानासमोर दूध वाटप करण्यात आले.

या उपक्रमाद्वारे 'प्रहार'च्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वैशाली येडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेस निवडणूक आयोगाने नुकतीच प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यानंतर शेतकऱ्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळावी, ही भूमिका घेत यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनच्या उदघाटक व शेतकरी महिला वैशाली येडे यांना आमदार बच्चू कडू यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

Updated : 31 March 2019 11:59 AM IST
Next Story
Share it
Top